योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्ताला ‘तुमच्या मृत मुलाचा लिंगदेह सुखरूप आहे’, असे सांगणे

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याविषयीचे काही बोलके अनुभव …

योगतज्ञ दादाजी वैशंपायन
श्री. अतुल पवार

‘१.१.१९९५ या दिवशी अंधेरी, मुंबई येथील श्री. कानविंदे यांचा मुलगा रोहन हा जलाशयात अकस्मात् बुडून मरण पावला. या घटनेमुळे कानविंदे कुटुंबातील सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वांचीच मने अस्वस्थ झाली. त्यानंतर कानविंदे कुटुंबीय योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांना भेटले आणि त्यांना जड अंतःकरणाने घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा योगतज्ञ दादाजी यांनी सूक्ष्म जगताशी संपर्क साधून त्या मुलाच्या लिंगदेहाची माहिती काढली आणि त्यांना सांगितले ‘तुमच्या मुलाचा लिंगदेह सूक्ष्म जगतात चंद्रलोकाज‍वळच्या एका लोकात सुखरूप आहे.’ योगतज्ञ दादाजींनी असे सांगितल्यावर कानविंदे कुटुंबियांचे दुःख हलके झाले आणि त्यांनी शक्तीदेवतांना मनोमन वंदन करून योगतज्ञ दादाजींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’

– संग्राहक श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२४)

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.