संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर येथे आगमन !

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच अन्य

सोलापूर – आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ११ जुलैला सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच अन्य

सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे आगमन सकाळी १०.४० वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले. पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलींच्या रथाचे सारथ्य केले. टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखाने ‘जय हरि विठ्ठल-जय हरि विठ्ठल’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते.

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले

प्रत्येक वारकर्‍याच्या चेहर्‍यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर पार करत होते.

वारकर्‍यांना चालून त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांना आराम मिळावा यासाठी ‘फूट मसाज यंत्रा’ची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.