श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथासह साहित्याला चांदीची झळाळी !

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीतील २७ व्यापारी आणि कारागीर यांनी पालखी रथासह साहित्यालाही झळाळी दिली आहे. हे सर्वजण सद्गुरुदास गोपाळकृष्ण पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी आहेत.

विशाळगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे रायगडावर आलेल्या विशाळगडप्रेमींना सरकार निराश होऊ देणार नाही. विशाळगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

माणगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची चोरी !

विनाअनुमती वाळू उपसा होत असतांना माण येथील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन काय करत आहे ? याविषयी प्रशासनातील संबंधितांवर काय कारवाई करणार ? हे प्रशासनाने स्पष्ट करावे.

फुरसुंगी (पुणे) येथे पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह !

ज्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला, तो टँकर हांडेवाडी येथील पुरुषोत्तम ससाणे यांचा आहे. २० जूनला सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करतांना टँकरच्या पाईपमध्ये साडी अडकल्याने ही घटना उघडकीस आली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २५ हून अधिक बेकर्‍या प्रदूषणकारी !; मोठे झाड अंगावर कोसळून वृद्धेचा मृत्यू !…

डेंग्यू आणि मलेरिया यांच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मे आणि १५ जूनपर्यंत मलेरियाचे ७२ रुग्ण आढळून आले आहेत, तर डेंग्यूचे २४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण हे आदिवासी परिसरातील रुग्णांपेक्षाही अधिक आहेत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तिथीनुसार राज्याभिषेकदिन उत्साहात !

प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुसार म्हणजे ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना निमंत्रण !

येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी भेटून १२ व्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च निमंत्रण दिले.

ठाणे येथे विद्यार्थ्यांना मनसेकडून वह्यांचे वाटप !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना ठाणे येथील वर्तकनगर भागात वह्यांचे वाटप करण्यात आले. मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या मुला-मुलींनी घेतला.

मांडवे (जिल्हा सातारा) येथील सैनिक ज्ञानेश्वर खाडे हुतात्मा !

खटाव तालुक्यातील मांडवे येथील वीर सैनिक ज्ञानेश्वर हनुमंत खाडे (वय २१ वर्षे) यांना जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे वीरमरण आले. खटाव तालुक्यातील मांडवे गावचे पैलवान हनुमंत खाडे यांचे ते सुपुत्र होते.

पोलिसांना धर्म आणि नीती शिकवा !

पोलिसांना कायदे, नीती आणि धर्म शिकवा, म्हणजे ते निरपराध्यांचा छळ करण्याचे अन् खोटे अहवाल तयार करण्याचे पाप करणार नाहीत !’