मिरज येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निषेध आंदोलनाद्वारे मागणी !
मिरज, २४ सप्टेंबर (वार्ता.) – पैगंबर जयंती निमित्त दौंड (जिल्हा पुणे) येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये काही धर्मांधांनी पाकिस्तानचा झेंडा फडकावून देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मिरज येथील महाराणा प्रताप चौक येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २३ सप्टेंबर या दिवशी जाहीर ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले. या वेळी पाकिस्तानच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी घोषणा दिल्या. या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख श्री. विजय शिंदे, विभाग प्रमुख श्री. प्रकाश जाधव, भाजपचे उपजिल्हाप्रमुख श्री. सूर्यकांत शेंगणे, श्री. अनिल रसाळ, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे, बजरंग दलाचे संयोजक श्री. आकाश जाधव, सर्वश्री संतोष दांडेकर, आकाश माने, भैय्या खाडिलकर, दत्ता गजगे, सोमनाथ मोरे, शुभम साळुंखे, प्रकाश जाधव यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शहर पोलीस ठाण्यात या मागणीचे निवेदन दिले.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? |