नवी मुंबई – तासिका तत्त्वावरील शिक्षकांना अंगणवाडी शिक्षिका आणि सफाई कामगार यांच्यापेक्षा अल्प मानधन असल्याने उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी प्राथमिक शिक्षकांना प्रतिघंटा २०० रुपये आणि माध्यमिक शिक्षकांना प्रतिघंटा २२५ रुपये मानधन मिळावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. तसेच शासन आदेशानुसार महिन्याला एक किरकोळ रजाही देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात कायम शिक्षक, करार पद्धतीवर आणि तासिका तत्त्वावर प्राथमिक अन् माध्यमिक शाळेत शिक्षक कार्यरत आहेत.
तासिका तत्त्वावर सध्या १३२ शिक्षक कार्यरत आहेत. अल्प मानधनमुळे अनेक शिक्षकांनी नोकरी सोडली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आदेशानुसार घड्याळी तासिका शिक्षकांचे वेतन प्रतिघंटा १७० रुपये आणि माध्यमिक शिक्षक घड्याळी प्रतिघंटा १९० रुपये शैक्षणिक आहे. अतिदुर्गम भागातील शाळांतील शिक्षकांना रहाण्याची, जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्या तुलनेत मुंबईसारख्या महागड्या शहरात अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जात आहे. प्राथमिक तासिका महिन्याला शिक्षकाला १० ते १२ सहस्र रुपये, तर माध्यमिक तासिका शिक्षकाला १६ ते १८ सहस्र रुपये मासिक मानधन मिळत आहे.