रायगड – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण काढण्यात सरकारला यश आले, याचा मनापासून आनंद होतो. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे रायगडावर आलेल्या विशाळगडप्रेमींना सरकार निराश होऊ देणार नाही. विशाळगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांचा धनुष्यबाण हातात असलेला जगातील पहिला पुतळा उमरखिंडी येथे उभारण्यात येईल, तसेच रायगडाच्या पायथ्याशी निर्माण होत असलेल्या शिवसृष्टीला निधी अल्प पडू देणार नाही.’’