कोल्हापूर – प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुसार म्हणजे ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी सकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस वेदमंत्रांचा जयघोष, दुग्धाभिषेक आणि ११ नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. प्रेरणामंत्र घेऊन आतषबाजी करण्यात आली. यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून ‘देवदर्शन पदयात्रा’ काढण्यात आली. ध्येयमंत्र आणि हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणाची पवित्र शपथ घेऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, सर्वश्री नीलेश पाटील, आशिष पाटील, सुमेध पोवार, रोहित अतिग्रे, अवधूत चौगले यांसह हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे यांसह धारकरी, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली – येथे राज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या वंदनीय उपस्थितीत सायंकाळी देवदर्शन पदयात्रा काढण्यात आली. या प्रसंगी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.