ठाणे येथे विद्यार्थ्यांना मनसेकडून वह्यांचे वाटप !

मनसेकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले वह्या वाटप

ठाणे, २१ जून (वार्ता.) – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना ठाणे येथील वर्तकनगर भागात वह्यांचे वाटप करण्यात आले. मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या मुला-मुलींनी घेतला. संदीप पाचंगे यांच्या वतीने असे विविध उपक्रम राबवण्यात येतात. मागील १० ते १२ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत.