पनवेल – पनवेल ते कर्जत रेल्वे लिंक रोड १५ महिन्यांत कार्यान्वित होणार असून नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या बोगद्यातून रूळ टाकण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये मार्ग कार्यान्वित होईल. या मार्गामुळे सी.एस्.एम्.टी. ते कर्जत या प्रवासाचा वेळ २० मिनिटांनी वाचणार आहे.