थोडक्यात…

हवामान अभ्यासकांनी ४ किंवा ५ जून या दिवशी पावसाचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे. या कालावधीत मध्यम सरी पडतील.

प्रवाशांनी बंद केलेला लोकलचा दरवाजा संतप्त प्रवाशांकडून तोडण्याचा प्रयत्न

प्रचंड गर्दीमुळे दिवा रेल्वेस्थानकात झालेला प्रकार !

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकातील मेगाब्लॉक संपला !

गेल्या ३ दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील रेल्वेस्थानकात चालू असलेला लोकलचा ३६ घंट्यांचा मेगाब्लॉक २ जून या दिवशी संपला. दोन्ही मेगाब्लॉक संपल्याची घोषणा रेल्वेने केली.

लोणावळा (पुणे) येथे प.पू. साध्वी नमिवर्षा श्रीजी यांना ‘जिनशासन रत्न’ पदवी बहाल !

जयानंद धाम, लोणावळा येथे प.पू. साध्वी श्री नमिवर्षा श्रीजी म.सा. यांच्या २५ व्या दीक्षा दिवसानिमित्त ‘संयम रजत यात्रा महोत्सव’ ३० मे या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला.

भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप लक्षात घ्या !

गोरक्षक असल्याचे भासवून कसायांना साहाय्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरावर कारवाई करावी !

गोरक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे करणार्‍या गोरक्षकांविरुद्ध खोटी तक्रार प्रविष्ट करून गोरक्षकांना अडकवण्याचे षड्यंत्र करणार्‍या अशा घुसखोरांपासून जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे. बांगलादेशी घुसखोरांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे वरील घटनेतून लक्षात येते !

सांगली शहरातील कॅफेचालकांवर कडक निर्बंध घालणार !

शहरातील १०० फूटी रस्त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर ‘हँग ऑन कॅफे’सह ३ अवैध कॅफेची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी पुढील कार्यवाहीला प्रारंभ केला.

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी !

डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हळनोर, शिपाई घटकांबळे यांच्याही पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाने वाढ केली आहे.

४ जूनच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त !

सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे.

लाच घेणारा अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज येथील बँक लॉकरमध्ये कोट्यवधी रुपये आणि सोने मिळाले !

पाटबंधारे विभागात कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याला २८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना परळी येथे रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.