गोरक्षक असल्याचे भासवून कसायांना साहाय्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरावर कारवाई करावी !

समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचे पोलिसांना तक्रार पत्र

पुणे, २ जून (वार्ता.) – ओम गुरुंग हा काही दिवसांपूर्वी गोरक्षकांमध्ये मिसळला होता आणि काही कारवाईसाठी त्याने गोरक्षकांना साहाय्य केले होते; पण प्रत्यक्षात तो गोरक्षक नसून पुण्यात गाडी चोरीचे रॅकेट चालवणारा चोर आहे. त्याने अनेक वाहने चोरून परगावात विकली आहेत. त्याने गोरक्षकांना अडकवण्यासाठी ॠषिकेश कामथे, अक्षय कांचन आणि इतर यांच्या विरोधात मारहाणीची खोटी तक्रार प्रविष्ट केली आहे. तो मध्यप्रदेशच्या कसायांकडून मोठ्या प्रमाणात हप्ता घेऊन गोवंश कत्तलीच्या गाड्या पास करून देतो. ओम गुरुंगला त्याच्या नावे कसायांनी पाठवलेले पैसे याचे असंख्य पुरावे गोरक्षकांकडे उपलब्ध आहेत. तो बांगलादेशी घुसखोर जमातीपैकी असूनही ‘मी नेपाळी आहे’, अशी बतावणी करतो. या माणसाला अजूनही पोलिसांनी अटक केली नाही, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, असे तक्रार पत्र समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी पोलिसांना दिले आहे. (गोरक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे करणार्‍या गोरक्षकांविरुद्ध खोटी तक्रार प्रविष्ट करून गोरक्षकांना अडकवण्याचे षड्यंत्र करणार्‍या अशा घुसखोरांपासून जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे. बांगलादेशी घुसखोरांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे वरील घटनेतून लक्षात येते ! – संपादक)