प्रवाशांनी बंद केलेला लोकलचा दरवाजा संतप्त प्रवाशांकडून तोडण्याचा प्रयत्न

प्रचंड गर्दीमुळे दिवा रेल्वेस्थानकात झालेला प्रकार !

संतप्त प्रवाशी लोकलचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतांना

ठाणे – ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता. यासाठी ५३४ लोकल सेवा रहित करण्यात आल्या. कल्याण येथून सुटणार्‍या लोकल रहित झाल्याने कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा स्थानकात पुष्कळ गर्दी झाली. त्यामुळे प्रवाशांनी दिवा स्थानक येण्यापूर्वीच लोकलचा दरवाजा बंद केला. स्थानकावरील संतप्त प्रवाशांनी लोकलचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.