लाच घेणारा अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज येथील बँक लॉकरमध्ये कोट्यवधी रुपये आणि सोने मिळाले !

भ्रष्टाचाराने पोखरलेला पाटबंधारे विभाग !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बँक लॉकरची पडताळणी करतांना  (सौजन्य: Lokprashna Live)

मिरज, २ जून (वार्ता.) – मौजे चिंचोटी (जिल्हा बीड) येथे तलावातील गाळ आणि माती शेतात टाकण्यासाठी अनुमती मिळण्यासाठी माजलगाव (जिल्हा बीड) येथील पाटबंधारे विभागात कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर (रा. भाग्यश्री अपार्टमेंट, कुपवाड रोड, मिशन रुग्णालयजवळ, मिरज) याला २८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना परळी येथे रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते. यानंतर त्याच्या मिरज येथे असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या बँकेतील लॉकरची बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. त्यामध्ये तब्बल १ कोटी ५० लाख रुपये किमतीचे २ किलो १०५ ग्रॅम वजनाचे सोने आणि ११ लाख ८९ सहस्र रुपये रोकड आढळून आली.

संपादकीय भूमिका 

भरघोस वेतन आणि शासकीय सुविधा असतांनाही शेतकर्‍यांकडून लाच घेणार्‍या अशा अधिकार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा करायला हवी !