खडवली येथे झोपडपट्टीतून दगड मारणार्‍यांचा शोध चालू !

या घटनेत २ प्रवासी गंभीर घायाळ झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाली. दोघांना तत्परतेने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी आंबिवली, शहाड परिसरात लहान मुले रेल्वेमार्गात खेळतांना गाडीवर दगड फेकत अनेकदा उघडकीस आले आहे.

सनातन संस्थेचे वैशिष्ट्य : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तत्त्वनिष्ठा शिकवणे !

सनातन संस्था गुरुरूपी देहाची नव्हे, तर तत्त्वाची उपासना करण्यास सांगते आणि तत्त्वरूपी कार्य केलेल्या श्रीगुरूंचे पूजन, तसेच त्यांचे महत्त्व समाजापुढे प्रस्तुत करते.

ठाणे येथील घोडबंदर रस्त्यावर वारंवार अपघात

भाईंदरपाडा येथे पहाटेच्या वेळी एक दांपत्य कामावर जाण्यास निघाले होते. एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकी पुढे घसरत गेली. दुचाकीवरील दांपत्य खाली पडून महिला गंभीर घायाळ झाली.

वफ्फबोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !

सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांती यांचा अनुभव घेतात ! – शॉर्न क्लार्क, गोवा

बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.

मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती : अनेक प्रकल्पांमध्ये केवळ १५ टक्के पाणी !

मार्चच्या अखेरीकडे जात असतांनाच मराठवाड्यात पाण्याची गंभीर स्थिती असल्याचे समोर आला आहे. अनेक लघु, मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणी उरले असून मराठवाड्यातील पाणीसाठा झपाट्याने तळ गाठत आहे.

पाणीटंचाई असतांना सिंहगड रस्त्यावर (पुणे) लाखो लिटर पाणी वाया !

गेल्या ८ दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया जात असून, रस्त्यावर तलाव निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ८ दिवस पु.ल. देशपांडे उद्यानाजवळील रस्त्यावर पाणीगळती होत आहे.

सनातन धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणारी सनातन संस्था !

सनातन धर्म आणि संस्कृती यांचे खरे स्वरूप टिकवून ठेवणे, हे या धर्माच्या अनुयायांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडणारी आजची आघाडीवरची संस्था म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे. या संस्थेचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांमुळे अखंड चालू आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

‘सूक्ष्म दृष्टीने संचरण करून आपल्या आतील चेतना कशी जागृत करावी ?’, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.’…..

पिंपरी येथे विनापरवाना रस्ते खोदणार्‍यांवर गुन्हे नोंद !

शहरातील विनापरवाना चालू असलेल्या खोदकामाची पोलिसांनी पहाणी चालू केली आहे. वाहतूक विभागाच्या अनुमतीविना रस्ते खोदणार्‍यांवर गुन्हे नोंद केले जाणार आहेत.