नागरिकांनी तक्रार करूनही पालिका अधिकार्यांची निष्क्रीयता !
पुणे – गेल्या ८ दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर लाखो लिटर पाणी वाया जात असून, रस्त्यावर तलाव निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ८ दिवस पु.ल. देशपांडे उद्यानाजवळील रस्त्यावर पाणीगळती होत आहे. जवळच पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आहे, तरीही या गळतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकीकडे पाणीटंचाई असतांना दुसरीकडे अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने पुणेकरांनी संताप व्यक्त केला. याविषयी सजग नागरिक लोकेश बापट यांनी तेथून जातांना हे दृश्य पाहून क्षेत्रीय कार्यालयात तक्रार प्रविष्ट केली. ‘त्यांना एक-दोन दिवसांमध्ये त्यावर उपाय करण्यात येतील’, असे सांगण्यात आले. ‘आठवडा झाला, तरी पालिका अधिकारी काहीच करत नाहीत, अधिकारी, कर्मचारी झोपले आहेत का ?’ असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सिंहगड रस्त्यावर ‘रोहन कृतिका’ या मोठ्या सोसायटीच्या जवळ एका ठिकाणी पाणीगळती होत आहे. आठवडा झाला, तरी त्याकडे कुणाचे लक्ष नाही. दुचाकी, चारचाकी वाहने साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जात आहेत; परंतु स्थानिक लोकांनी कुणालाही तक्रार केली नाही आणि केली असेल तरी अधिकार्यांचेही लक्ष नाही. आठवडा झाला सिंहगड रोड पाण्याखाली गेला आहे.
संपादकीय भूमिकाखरेतर नागरिकांनी तक्रार करण्याआधी अधिकार्यांनी उपाययोजना काढणे आवश्यक आहे. तक्रार करूनही निष्क्रीय रहाणार्या अशा कामचुकार अधिकार्यांवर कठोर कारवाई करायला हवी ! |