अनेक संप्रदायांचे अनुयायी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या हयात असणार्या गुरूंचे पूजन करतात, तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या गुरूंचे महत्त्व आवर्जून सांगितले जाते. याउलट सनातन संस्थेच्या वतीने साजर्या होणार्या गुरुपौर्णिमा महोत्सवात प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राचे पूजन केले जाते आणि गुरुपरंपरेचा प्रारंभ केलेल्या महर्षि व्यासांचे महत्त्व अन् वैशिष्ट्य सांगितले जाते. यात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गुरुस्थानी असूनही त्यांचा कुठेही उल्लेख केला जात नाही. सनातन संस्था गुरुरूपी देहाची नव्हे, तर तत्त्वाची उपासना करण्यास सांगते आणि तत्त्वरूपी कार्य केलेल्या श्रीगुरूंचे पूजन, तसेच त्यांचे महत्त्व समाजापुढे प्रस्तुत करते. तत्त्वनिष्ठ गुरुच त्यांच्या शिष्यांना आणि साधकांना तत्त्वाची उपासना करण्याविषयी अशा प्रकारे कृतीतून मार्गदर्शन करतात. यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जरी देहत्याग केला, तरीही तत्त्वनिष्ठ राहून साधना करणार्या साधकांना साधना करतांना कुठेच अडचण येणार नाही आणि गुरुपौर्णिमेचा उत्सवही साजरा होत राहील. साधकांना स्वतःच्या देहात अडकू न देता त्यांना तत्त्वाशी जोडणारे धन्य ते गुरु आणि धन्य त्यांची थोरवी ! – सुश्री (कु.) मधुरा भोसले (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २००७)