रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. महाराष्ट्रातील मान्यवरांचे अभिप्राय

१ अ. कोल्हापूर

१ अ १. श्री. संदीप बाळासाहेब पारळे (श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), आजरा, जिल्हा कोल्हापूर.

अ. ‘या प्रदर्शनात मला दैवी सूक्ष्म कण प्रत्यक्ष बघायला मिळाले.’

१ अ २. श्री. नाथ नारायण देसाई (तालुका महासचिव, भाजप), तालुका आजरा, कोल्हापूर, महाराष्ट्र. 

अ. ‘हे प्रदर्शन मला नाविन्यपूर्ण वाटले.’

१ आ. सातारा

१ आ १. श्री. राजेंद्र शंकर शिंदे (शहर प्रमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेना), महाबळेश्वर, सातारा.

अ. ‘असे प्रदर्शन मी कधी पाहिले नाही. हे प्रदर्शन पाहून मला आश्चर्य वाटले.’

१ आ २. अधिवक्ता दत्तात्रय सणस (प्रमुख कार्यवाह, हिंदू महासभा, महाराष्ट्र कार्यकारिणी), सातारा

अ. ‘हे प्रदर्शन पाहून मला धन्य वाटले.’

१ इ. श्री. अनिल सोमा चौधरी (जिल्हा कार्यकारी अध्यक्ष, श्री योगवेदांत सेवा समिती), जळगाव

१. ‘प्रदर्शन पाहून ‘नामजप आणि साधना हीच संपत्ती आहे’, याची मला जाणीव झाली.’

१ ई. अमरावती

१ ई १. श्री. अनुप प्रमोद जयस्वाल (सचिव, देवस्थान सेवा समिती विदर्भ), अमरावती

अ. ‘हे प्रदर्शन पाहिल्यावर माझ्या ज्ञानात भर पडली आणि माझी अध्यात्मातील रुची वाढली.’

२. राजस्थानमधील मान्यवरांचे अभिप्राय

२ अ. महंत श्री. दीपक वल्लभ गोस्वामी (संस्थापक आणि अध्यक्ष, ज्ञानम् फाउंडेशन), जयपूर

१. ‘सूक्ष्म दृष्टीने संचरण करून आपल्या आतील चेतना कशी जागृत करावी ?’, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)

  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक