पुणे शहरात धूलिवंदनाच्या दिवशी १४२ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे नोंद !

सण धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत ? हे न शिकवल्याचा परिणाम ! शासनकर्त्यांनी आतातरी जनतेला धर्मशिक्षण देण्याची सोय करावी, हे अपेक्षा !

लंडनमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवणार्‍या भारतीय विद्यार्थ्याच्या विरोधात चालवली जात आहे मोहीम !

याआधी ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या विद्यार्धी संघटनेची निवडणूक जिंकून संघटनेची अध्यक्ष बनलेल्या रश्मी सामंत हिला साम्यवाद्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने पदाचे त्यागपत्र दिले होते. यावरून ब्रिटनमधील विद्यापिठांमध्ये कशा प्रकारे भारतविरोधी टोळी कार्यरत आहे, हे दिसून येते !

Maharashtra Loksabha Elections : निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात २३.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त !

जप्त करण्यात आलेले पैसे एवढे असतील, तर जप्त न केलेले पैसे, मद्य आणि अमली पदार्थ यांचे वितरण किती प्रमाणात झाले असेल, याचा विचारही न केलेला बरा !

मागील लोकसभा निवडणुकीत देशातील तब्बल ८५ टक्के उमेदवारांच्या ठेवी जप्त !

मागील म्हणजे वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ८५.९३ टक्के उमेदवारांना त्यांची ठेवही राखता आली नाही.

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी पोलिसांच्या कह्यात !

एकात्री विनोदी कार्यक्रमातून हिंदु धर्मावर अवमानास्पद टिप्पण्या करणारा मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी एका बेकायदेशीर हुक्का पार्लरवर धाड टाकल्यानंतर कह्यात घेतले होते.

‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचा देहत्याग

‘रामकृष्ण मिशन’ या संघटनेचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे २६ मार्च या दिवशी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

मॉस्कोमधील आतंकवादी आक्रमणामागे अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेन यांचा हात ! – रशिया

क्रोकस सिटी हॉल येथे झालेल्या आक्रमणामागे अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेन यांचा हात आहे, असा दावा रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’चे प्रमुख अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह यांनी केला.

गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप

यातून लक्षात येते की, आय.एस्.आय.च्या माध्यमांतून पाक सैन्य पाकच्या सर्वच सरकारी व्यवस्थांवर अधिकार गाजवत आहे !

सदानंद दाते राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (‘एन्.आय.ए.’चे) नवीन महासंचालक

केंद्र सरकारने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.

अमेरिकी सरकारने नौकेवरील भारतीय कर्मचार्‍यांचे केले कौतुक !

अमेरिकेच्या सरकारने या नौकेवरील कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. नौका पुलाला धडकणार, हे लक्षात आल्यावर कर्मचार्‍यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.