लंडनमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवणार्‍या भारतीय विद्यार्थ्याच्या विरोधात चालवली जात आहे मोहीम !

खलिस्तान्यांच्या भारतीय दूतावासावरील आक्रमणाच्या वेळी या तरुणाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला होता !

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणा

लंडन (ब्रिटन) : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विश्‍वविद्यालयाचा विद्यार्थी असणारा भारतीय तरुण सत्यम सुराणा याने आरोप केला आहे की, तो विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवत असल्यामुळे त्याच्या विरोधात मोहीम चालवण्यात येत आहे.

सत्यम मूळचा पुणे येथील आहे. त्याने व्हिडिओ प्रसारित करून म्हटले आहे, ‘मतदानाच्या १२ घंटे आधीपासून माझे नाव भाजपशी जोडले जाऊ लागले. मला ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही विचारसरणीचा) म्हणत माझ्यावर बहिष्कार घालण्याच्या मागण्या करण्यात आल्या. भारत माझा देश आहे आणि मी त्याला नेहमीच पाठिंबा देईन. माझा देश आणि सरकार याबाबतची माझी मते वैयक्तिक आहेत. ब्रिटनच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकांशी त्यांचा काहीही संबंध नसावा. माझ्याविरुद्ध खोटा प्रचार करणारे बहुतेक साम्यवादी आहेत. भारताची प्रगती होत आहे, हे लोकांना सहन होत नाही. खलिस्तानींना आतंकवादी म्हटल्याने मला लक्ष्य केले जात आहे. लोक त्याला नाझी समर्थक आणि उजव्या विचारसरणीचे म्हणत आहेत. विशेष म्हणजे मला विरोध करणारे बहुतेक भारतीय आहेत, याचे मला अधिक दुःख वाटत आहे. (देशद्रोही भारतीय ! अशांची माहिती भारतीय अन्वेषण यंत्रणांनी गोळा केली पाहिजे आणि हे भारतीय पुन्हा देशात आल्यास त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

(सौजन्य : Oneindia News)

कोण आहे सत्यम सुराणा ?

सत्यम सुराणा हा तोच आहे ज्याने गेल्या वर्षी लंडनमधील भारतीय दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी केलेल्या आक्रमणाच्या वेळी भूमीवर पडलेला भारतीय ध्वज उचलून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला होता. त्या वेळी त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता.

संपादकीय भूमिका

  • लंडनमध्ये राष्ट्रप्रेमी भारतीय तरुणाच्या विरोधात मोहीम चालवणार्‍यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक करतील का ?
  • याआधी ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापिठाच्या विद्यार्धी संघटनेची निवडणूक जिंकून संघटनेची अध्यक्ष बनलेल्या रश्मी सामंत हिला साम्यवाद्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिने पदाचे त्यागपत्र दिले होते. यावरून ब्रिटनमधील विद्यापिठांमध्ये कशा प्रकारे भारतविरोधी टोळी कार्यरत आहे, हे दिसून येते !