ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर त्वरित बैठक घ्यावी !- डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मुंबई – ऊसतोड कामगार त्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या साखरशाळा आणि आरोग्य यांविषयी २८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. या वेळी सुरेश धस म्हणाले की, साखर कारखाना मालक साखर शाळांविषयी गंभीर नाहीत. त्यामुळे स्वत:च्या पालकांच्या समवेत स्थलांतर करणारे विद्यार्थी शाळाबाह्य होतात. परिणामी भविष्यात ही मुले ऊसतोडीकडे वळतात.

याविषयी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर त्वरित बैठक घेण्याचे निर्देश दिले.