सागरी मार्ग (कोस्टल रोड) येत्या ८ दिवसांत चालू करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

सागरी मार्गाचा (कोस्टल रोड) बिंदूमाधव चौक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा भाग येत्या ८ दिवसांत चालू करणार, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २९ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पातून राज्याच्या तिजोरीची लूट ! – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

सरकारने सादर केलेला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्याच्या तिजोरीची लूट करणारा असून राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला असतांना अनेक योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाकडून सरकारवर करण्यात आला.

विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांकडून सरकारचा निषेध !

१ मार्च रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा भ्रमनिरास करणारा, राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांकडून पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या मान्य !

ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणार्‍या निवृत्ती वेतनाच्या मानधनासंबंधीच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्या आहेत.

महावितरणचे प्रधान यंत्रचालक संतोष कुलकर्णी सेवानिवृत्त

मागील वर्षी प्रशासनाने वीज कंपनीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून त्यांना उत्कृष्ट यंत्रचालक हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता.

मातृभाषेतून आकलन चांगले होते ! – डॉ. सुधीर एम्. देशपांडे

कुसुमाग्रज यांनी त्यांच्या साहित्यातून क्रांतीची प्रेरणा सर्वांच्यात निर्माण केली. त्यांनी मराठी भाषेची थोरवी आपल्या कवितेतून वर्णन केली आहे.

तेलंगाणामध्ये खोदकामाच्या वेळी सापडली १ सहस्र ३०० वर्षांपूर्वीची २ मंदिरे !

तेलंगाणाच्या कृष्णा नदी किनारी वसलेल्या मुदिमानिक्यम गावात पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ भूमीचे खोदकाम करत असतांना त्यांना दगड तुटण्याचा आवाज आला. जेव्हा त्यांनी माती बाजूला करून पाहिले, तेव्हा तिथे दुर्मिळ शिलालेखासह बादामी चालुक्य काळातील २ मंदिरे सापडली.

 ‘नमो ब्रिगेड’चे संस्थापक चक्रवर्ती सूलिबेले यांच्या कलबुर्गी (कर्नाटक) जिल्हा प्रवेशावरील बंदी उच्च न्यायालयाने उठवली !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारला चपराक !

चिक्कपेटे (कर्नाटक) येथे भर रस्त्यात नमाजपठण, गुन्हा नोंद !

राज्यसभा निवडणुकीतील विजय साजरा करतांना काँग्रेस उमेदवार नासिर हुसेन यांच्या पाठीराख्यांनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्याचा आरोप होत असतांनाच आता भर रस्त्यात मुसलमानांनी नमाजपठण केल्याचे वृत्त समोर आले आहे.

अमेरिकेत विषारी इंजेक्शनने गुन्हेगाराला मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न अपयशी !

विदेशांत मृत्यूदंड देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची भारतात चर्चा होत असतांना भारतात दोषींना देण्यात येणारी मृत्यूदंडाची शिक्षा कशी कार्यान्वित होईल ?, याचीही चर्चा होणे आवश्यक !