प्रत्येक रुग्ण साधकावर अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रेमाने उपचार करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६४ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्ण नवमी (५.१.२०२४) या दिवशी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

गुरुदेवा, व्हावे मी तव चरणीचा एक धूलीकण ।

युगांमागूनी युगे चालली गुरुदेवा, करावी तव प्रीतीची आराधना । सदा अनुसंधानात रहावे तुमच्या, श्वासागणिक तव प्राप्तीची याचना ।। १ ।।
साधनेतील आरंभीचा उत्साह, न ती तळमळ उरे अंतरी । तरी गुरुदेवा, हात देता पदोपदी, तव कृपे साधनेचा दीप तेवे हृदयमंदिरी ।। २ ।।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात हिंदु राष्ट्राची अनुभूती घेणारे सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७९ वर्षे) आणि सौ. सुलभा कुलकर्णी (वय ७४ वर्षे) !

‘२७ ते ३०.९.२०२३ या कालावधीत आम्हाला गुरुमाऊलींच्या कृपेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या दर्शनाची सुवर्णसंधी लाभली. आश्रमाचे साक्षात् भूवैकुंठात झालेले परिवर्तन पाहून आम्हाला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

शिबिरासाठी गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे कळल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी मला जाणवले, ‘गुरुदेवांच्या कृपेने साधकांच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. ते साधकांकडून अधिकाधिक प्रार्थना करून घेतात आणि साधकांची भावभक्ती वाढवतात.’

आश्रमातील सात्त्विक लादीवर पाय घसरून पडूनही इजा न होणे आणि ‘प.पू. गुरुदेवांनीच अलगद झेलले आहे’, असे वाटणे

एवढ्या जोरात पडूनही मला कुठेही फारसे लागले नाही. तेव्हा ‘आश्रमातील सात्त्विक भूमी ही कापसाची लादीच आहे आणि मी पडत असतांना प.पू. गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) मला अलगद झेलले’, असे मला जाणवले.

मंदिरांच्या सुरक्षेसाठी ‘हिंदु राष्ट्र’ आवश्यक ! – प्रशांत वैती, हिंदु जनजागृती समिती

५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदूंच्या प्रभावी संघटनामुळे श्रीराममंदिराची स्थापना होत आहे. इतिहासातून धडा शिकून आपले मंदिर सुरक्षित रहावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे.

Sanatan Prabhat Exclusive : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दागिन्यांचे मूल्यांकन केल्याची नोंद ताळेबंदामध्ये यायला हवी ! – लेखापरीक्षक संजय सूर्यवंशी

देवाचे दागिने आणि मंदिरातील चांदी यांची ताळेबंदामध्ये नोंद नसल्याचे लेखापरीक्षकांनी स्पष्ट नमूद केले आहे. यावरून मंदिरे समितीची अनागोंदीच उघड होत आहे.

श्रमजीवी एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील २ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा !

‘जिहादी आतंकवाद्यांना १९ वर्षांनी मिळालेली शिक्षा ही या प्रकरणात ठार झालेल्या कुटुंबियांवर झालेला अन्यायच नव्हे का ?’, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?

यंदा गोवा अथवा मसुरी नव्हे, तर अयोध्या आणि वाराणसी येथे लोकांची अभूतपूर्व गर्दी !

हिंदु समाज हा धार्मिक आहे. मध्यंतरीच्या काळात विविध कारणांमुळे त्याच्यातील धार्मिक वृत्ती अल्प झाली होती. आता हिंदूंमध्ये धार्मिक वृत्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्‍यांना ही चपराक आहे !

Denigration Prabhu Shriram : ‘श्रीराम मांसाहारी होता’ असे म्हणणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध नाशिक येथे गुन्हा नोंद !

आव्हाड कधी श्री सरस्वती देवीचा, कधी प्रभु श्रीरामाचा, तर कधी हिंदु धर्माचा अशलाघ्य भाषेत करत असलेल्या अवमानावरून त्यांच्या नसानसांत हिंदुद्वेष किती भिनला आहे ?, हेच दिसून येते ! आव्हाड यांना मते देऊन निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?