श्रमजीवी एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील २ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा !

जौनपूर (उत्तरप्रदेश) – श्रमजीवी एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील २ जिहादी आतंकवाद्यांना जौनपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा सुनावलेल्या आतंकवाद्यांमध्ये नफीकुल आणि हेलालुद्दीन यांचा समावेश आहे. या प्रकरणी यापूर्वी ओबेदुर रहमान आणि आलमगीर या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सौजन्य दैनिक जागरण 

२८ जुलै २००५ या दिवशी हरिहरपूर रेल्वे क्रॉसिंगजवळ श्रमजीवी एक्सप्रेसमध्ये बाँबस्फोट झाला होता. (‘जिहादी आतंकवाद्यांना १९ वर्षांनी मिळालेली शिक्षा ही या प्रकरणात ठार झालेल्या कुटुंबियांवर झालेला अन्यायच नव्हे का ?’, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ? – संपादक) या स्फोटात १४ जण ठार झाले होते, तर ६२ हून अधिक प्रवासी घायाळ झाले होते. या प्रकरणातील इतर दोषींना वर्ष २०१६ मध्येच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्या याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.