अयोध्येत १० दिवसांत १२ सहस्र रामभक्तांनी घेतले प्राथमिक उपचार !

श्रीरामजन्मभूमीतील नूतन मंदिरात स्थानापन्न झालेल्या रामरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांतील आतापर्यंत १२ सहस्र जणांनी  प्रथमोपचाराचा लाभ घेतला. येथील कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांना श्‍वसनाचे त्रास चालू झाले आहेत.

World War 3 : तिसरे महायुद्ध चालू झाले, तर ५ वर्षे चालेल !

विशेष म्हणजे हे युद्ध रशिया आणि अमेरिका यांच्यात पडलेल्या ठिणगीतून होऊ शकते, असेही यात म्हटले आहे. ‘द सन’ या वर्तमानपत्राने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मौजे वडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ९ वीतील अल्पवयीन धर्मांध विद्यार्थ्याने शाळेत टिपू सुलतानचे चित्र लावले !

वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून मुसलमान मुलांसमोर इस्लामी आक्रमकांचे उदात्तीकरण केले जाऊन त्यांनी केलेल्या कृत्यांना ‘क्रांतीकारी’ नि ‘आदर्श’ ठरवले जाते, हेच लक्षात येते. तसेच अशा मुलांकरवी कोण अशा कृती करवून घेतो, याचा तपासही व्हायला हवा !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी अविरत प्रयत्न करणे आवश्यक ! – पू. राजूदासजी महाराज, महंत, हनुमानगढी, अयोध्या

हिंदु राष्ट्र नसेल, तर सनातन धर्मही सुरक्षित रहाणार नाही. यासाठी सर्व हिंदूंनी हिदु राष्ट्राची जोरदार मागणी केली पाहिजे. त्यासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन अयोध्या येथील हनुमानगढीचे महंत पू. राजूदासजी महाराज यांनी केले.

ठाणे येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेत असल्याचे वास्तव उघड !

सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांनी खरेतर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर आधीच कारवाई करणे अपेक्षित होते. आता या चर्चासत्रानंतर या तस्करांच्या विरोधात केव्हापर्यंत कारवाई करणार, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

नाशिक येथे आतंकवादी संघटनांना पैसे पुरवणार्‍याला अटक !

भारतात बंदी असलेल्या आतंकवादी संघटनांशी संबंधित असलेल्या हुजेफ अब्दुल अजीज शेख याला आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर बंदी असलेल्या संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप आहे. अनेक खासगी आस्थापनांत त्याची भागीदारी आहे.

अध्यात्मातील संशोधनाचे महत्त्व !

‘विज्ञानाला बहुतेक काहीच ज्ञात नसल्याने एखादा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सारखे संशोधन करावे लागते. याउलट अध्यात्मात सर्वच ज्ञात असल्याने तसे करावे लागत नाही. अध्यात्मातील संशोधन हे विज्ञानयुगातील सध्याच्या पिढीचा अध्यात्मावर विश्‍वास बसून ती अध्यात्माकडे वळण्यासाठी करावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कांदळी (जिल्हा पुणे) येथील श्रीराममंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन !

‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू.भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ अन् समस्त कांदळी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.