World War 3 : तिसरे महायुद्ध चालू झाले, तर ५ वर्षे चालेल !

कृत्रिम बुद्धीमत्तेची (ए.आय.ची) माहिती !

लंडन (ब्रिटन) : कृत्रिम बुद्धीमतेने (एआय – आर्टिफिशल इंजेलिजन्सने) तिसर्‍या महायुद्धाविषयी एक माहिती दिली आहे. ‘जर तिसरे महायुद्ध चालू झाले, तर ते ५ वर्षे चालू राहू शकेल आणि यात २ कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या युद्धात अणूबाँबचा वापर करण्यासह आर्टिक येथेही हे युद्ध होऊ शकते’, असे ए.आय.ने सांगितले आहे. विशेष म्हणजे हे युद्ध रशिया आणि अमेरिका यांच्यात पडलेल्या ठिणगीतून होऊ शकते, असेही यात म्हटले आहे. ‘द सन’ या वर्तमानपत्राने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

(सौजन्य : How to Survive)

(सौजन्य : TOI)

१. ए.आय.च्या माहितीनुसार वर्ष २०२४ मध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यातील ठिणगी पूर्व युरोप आणि आर्टिक क्षेत्रापर्यंत पोचेल अन् यात अनेक देश सहभागी होतील. वर्ष २०२५ मध्ये यात अधिक वाढ होईल. यात नाटो संघटनेतील देश आणि दुसरीकडे रशियाचे मित्रदेश सहभागी होतील. त्यानंतर सायबर आक्रमणे होऊ लागतील.

२. वर्ष २०२६ मध्ये तिसरे महायुद्ध चालू आहे, अशी घोषणा प्रत्यक्ष करण्यात येईल; कारण तेव्हापर्यंत जगातील सर्वच मोठे देश यात सहभागी झालेले असतील.

३. वर्ष २०२७ मध्ये अणूबाँबचा वापर करण्याच्या गोष्ट केल्या जातील; मात्र प्रत्यक्षात कुणीही याचा वापर करणार नाही. चीनसारखा देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात यात सहभागी होईल.

४. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न अधिक प्रमाणात केला जाईल; मात्र वर्ष २०२७ पर्यंत युद्ध चालूच रहाणार आहे.