कांदळी (जिल्हा पुणे) येथील श्रीराममंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन !

श्रीराममंदिर

जुन्नर (पुणे), २४ जानेवारी (वार्ता.) – कांदळी, तालुका जुन्नर (जिल्हा पुणे) येथील श्रीराममंदिरात २२ जानेवारी या दिवशी रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू.भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ अन् समस्त कांदळी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला उपस्थित भाविक

या कार्यक्रमाच्या अंतर्गत श्रीराममंदिर येथे सकाळी ६ ते ६:३० या वेळेत काकड आरती करण्यात आली. सकाळी १० ते ११.३० या वेळेत श्रीरामांना अभिषेक करण्यात आला. दुपारी १ ते २ या वेळेत प.पू. भक्तराज महाराज प्रासादिक भजनी मंडळ, कांदळी यांनी प.पू. बाबांची भजने गायली. दुपारी ३ ते ४.३० वाजता कांदळी येथील बाल प्रवचनकार कु. ओंकार गुंजाळ यांनी ‘श्रीसंत (श्री गुरुसेवेतून) भगवान श्रीरामांची प्राप्ती कशी करावी ?’ या विषयावर प्रवचन केले. संध्याकाळी ५ ते ७ शोभायात्रा आणि मिरवणूक सोहळा पार पडला. संध्याकाळी ७.३० वाजता प.पू. भक्तराज महाराजांच्या समाधीची नित्य नैमित्तिक आरती करण्यात आली.