नवाब मलिक सत्तेत सहभागी होण्याची शक्यता !

मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी हातमिळवणी करून मुंबईतील गोवावाला कंपाऊंड येथील ३ एकर भूमी हडप केल्याच्या आरोपावरून अटक झालेले आणि सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक विधानसभेत अजित पवार गटातील सदस्यांसमवेत बसले होते.

मुंबईकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता !

बृहन्मुंबई महानगरपालिका मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करणार असल्याने त्या जलाशयाची ७ डिसेंबर या दिवशी पहाणी करण्यात आली. त्यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक २ रिकामा करण्यात आला होता.

सौंदत्ती यात्रेसाठी ‘एस्.टी.’चा ‘खोळंबा आकार’ नाममात्र २० रुपये आकारण्यात येणार ! – राजेश क्षीरसागर

कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी प्रतिवर्षी कोल्हापूर येथून २०० हून अधिक एस्.टी. गाड्यांतून भाविक जातात. या यात्रेसाठी एस्.टी. महामंडळाच्या वतीने ‘खोळंबा आकार’ प्रतिघंटा ९८ रुपयांवरून नाममात्र २० रुपये करण्यात आला आहे.

वागातोर  येथे समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे स्थानिक त्रस्त !

नागरिकांना तापदायक ठरणार्‍या घटना न दिसणारे आणि त्या न रोखणारे निद्रिस्त प्रशासन !

गोव्यात गेल्या ४ वर्षांत व्यावसायिकांनी १ सहस्र ६०० कोटी रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ बुडवला

राज्यात मागील ४ आर्थिक वर्षांत १ सहस्र ५९९ कोटी ४२ लाख रुपयांचा ‘वस्तू आणि सेवा कर’ (‘जी.एस्.टी.’) बुडवल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.

बाळ्ळी येथे ‘बालरथ’ उलटला : २४ विद्यार्थी घायाळ

कुंकळ्ळी येथील कुंकळ्ळी युनायटेड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ‘बालरथ’ ७ डिसेंबर या दिवशी सकाळी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. ‘बालरथ’मधील ३४ पैकी ४ विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाले आहेत, तर २१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हद्दपार केलेला बांगलादेशी नागरिक पुन्हा गोव्यात !

भारत हा बांगलादेशी घुसखोरांसाठी नंदनवन ठरू नये ! भारत सरकारने लवकरात लवकर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा करून तो कार्यवाहीत आणावा !

थकित वेतन मिळण्यासाठी शिक्षकांचे आमरण उपोषण !

शिक्षकांच्या वेतनाची अडवणूक करणार्‍यांची सखोल चौकशी करून संबंधितांना शिक्षा करावी !

स्नानगृहातील तरुणीचे चित्रीकरण करणार्‍या कर्मचार्‍याला अटक !

अशा वासनांधांवर रुग्णालय प्रशासन कठोर कारवाई करेल का ?

कर्मचार्‍यांनी उद्धट वर्तन केल्याच्या संदर्भात नोटीस दिल्याने साहाय्यक आरोग्य अधिकार्‍याला मारहाण !

प्रशासकीय अधिकारी जेथे असुरक्षित आहेत, तेथे सामान्य जनांचे काय ? कायदा-सुव्यवस्थेविषयी गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण होणे आवश्यक आहे.