कर्मचार्‍यांनी उद्धट वर्तन केल्याच्या संदर्भात नोटीस दिल्याने साहाय्यक आरोग्य अधिकार्‍याला मारहाण !

माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर गुन्हा नोंद !

पुणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-क्षेत्रीय कार्यालयात राजेश भाट हे साहाय्यक आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत असून त्यांनी शंकर सोनवणे यांना विनाअनुमती अनुपस्थित रहाणे, तसेच उद्धट वर्तन करणे या संदर्भात नोटीस पाठवली. या कारणावरून सोनावणे यांनी इतर साथीदारांसामवेत येऊन राजेश भाट यांना शिवीगाळ केली, तसेच मारहाण करण्यासाठी अंगावर धावून गेले. सोनावणे यांच्या समवेतील अनोळखी व्यक्तीने भाट यांना मारहाण करत कार्यालयात ओढून नेले. सोनवणे यांनी ‘तुझ्या नावाने आत्महत्या करून नोकरी घालवतो’, अशी धमकी दिली, तसेच भाट शासकीय काम करत असतांना आरोपींनी अडथळा निर्माण केला. (प्रशासकीय अधिकारी जेथे असुरक्षित आहेत, तेथे सामान्य जनांचे काय ? कायदा-सुव्यवस्थेविषयी गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण होणे आवश्यक आहे. – संपादक) राजेश भाट यांच्या तक्रारीअन्वये शंकर सोनवणे, संतोष लांडगे आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यातील संतोष लांडगे हे भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती आहेत.