सातारा जिल्‍ह्यात १० नोव्‍हेंबरपर्यंत शस्‍त्र आणि जमावबंदी आदेश

जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी यांच्‍या आदेशानुसार ३१ ऑक्‍टोबर ते १० नोव्‍हेंबरपर्यंत सातारा जिल्‍ह्यात शस्‍त्र आणि जमावबंदी आदेश दिले आहेत.

घर आणि वाहने पेटवणार्‍यांवर ३०७ कलमान्‍वये गुन्‍हे नोंद होणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

मराठा आरक्षणाच्‍या आंदोलनात होणारी दगडफेक आणि जाळपोळ यांविषयी उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्‍यांनी घर आणि वाहने यांची जाळपोळ करणार्‍या आंदोलकांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्‍हे नोंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

सनातनच्‍या ग्रंथमालिका : ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा साधनाप्रवास’

प.पू. भक्‍तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांना ‘शिष्‍य’ म्‍हणून स्‍वीकारल्‍यावर अल्‍पावधीतच त्‍यांना ‘आपणासारिखे’ केले ! या साधनाप्रवासात डॉ. आठवले यांनी स्‍वतःच्‍या आंतरिक अवस्‍थांतील पालट, स्‍वतःच्‍या आध्‍यात्मिक उन्‍नतीचे मोजमापन इत्‍यादी नोंद करून ठेवले, तसेच याविषयी पुढे सनातनच्‍या ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांकडून जाणूनही घेतले.

संस्कृतचे अद्वितीयत्व आणि काँग्रेसचा करंटेपणा !

‘संस्कृत भाषेत भाषासौंदर्याने नटलेली आणि जीवनविषयक मार्गदर्शन करणारी सहस्रो सुभाषिते आहेत, तशी जगातील एका भाषेत तरी आहेत का ? अशा भाषेला काँग्रेस सरकारने मृतभाषा म्हणून उद्घोषित केले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

तमिळनाडू येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून हिंदु धर्माचा पुरस्कार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी त्यांच्या भाषणात सनातन हिंदु धर्माचे महत्त्व आणि भाजपची भूमिका यांवर भाष्य केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी मुथूरामलिंग यांच्या पूर्णाकृती सुवर्ण पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

नोकरीच्या बहाण्याने इजिप्तमध्ये नेऊन एका व्यक्तीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

गोव्यातील व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन देऊन इस्रायलऐवजी इजिप्तमध्ये नेण्यात आले आणि त्या ठिकाणी ‘मुसलमान धर्म स्वीकारल्यास दुसर्‍या देशात ये-जा करणे सोपे होईल’, असे सांगून २ संशयितांनी पीडित व्यक्तीवर दबाव टाकला…..

‘दुर्गवेध प्रतिष्‍ठान’च्‍या वतीने दुर्ग बांधणी स्‍पर्धा !

छत्रपती शिवरायांनी पहिला दुर्ग हा दिवाळीमध्‍ये जिंकला आणि त्‍यांच्‍या शौर्याचे प्रतीक म्‍हणून मातीचे छोटे छोटे दुर्ग बांधण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात चालू झाली. त्‍यातून आजच्‍या तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘दुर्गवेध प्रतिष्‍ठान’च्‍या वतीने हुपरी पंचक्रोशीसाठी दुर्ग बांधणी स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

पुणे येथील ‘ससून’मधील कैदी रुग्‍ण समितीचे ‘अध्‍यक्षपद नको’, अशी डॉ. धिवारे यांची मागणी !

डॉ. धिवार यांची नियुक्‍ती २७ सप्‍टेंबर या दिवशी झाली होती. ते रुग्‍णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षकही आहेत. डॉ. धिवारे यांनी ‘अध्‍यक्षपद नको’ असे पत्र दिले असले, तरी अधिष्‍ठाता डॉ. ठाकूर यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’ !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी झारखंड आणि बंगाल या राज्‍यांमध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र संपर्क अभियान’ राबवले. या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.

‘शासन आपल्‍या दारी’ योजनेच्‍या माहिती पुस्‍तिकेचे वितरण !

मिरज येथील प्रभाग क्रमांक ४ मध्‍ये महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलेल्‍या ‘शासन आपल्‍या दारी’ या योजनांची माहिती पुस्‍तिका आणि योजनांची माहिती नागरिकांना भेटून देण्‍यात आली. या प्रसंगी त्‍यांच्‍या अडचणी जाणून घेतल्‍या.