शिवसेनेचा उपक्रम !
मिरज – मिरज येथील प्रभाग क्रमांक ४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या योजनांची माहिती पुस्तिका आणि योजनांची माहिती नागरिकांना भेटून देण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
प्रभागात हे अभियान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते श्री. श्रेयस गाडगीळ, तसेच अन्य कार्यकर्ते राबवत आहेत.