कोलकात्यात ३१ डिसेंबरपासून अंडरवॉटर मेट्रोचा होणार प्रारंभ

देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी कोलकातामध्ये धावणार आहे. भूमीपासून ३३ मीटर खाली आणि हुगळी नदीतळाच्या १३ मीटर खाली ५२० मीटर लांबीच्या बोगद्यात रुळ टाकण्यात आले आहेत.

दीपावलीच्‍या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात फुलांची विशेष सजावट !

दीपावलीच्‍या प्रथम दिवशी म्‍हणजे १२ नोव्‍हेंबरला पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात पिवळी आणि भगवी झेंडूची फुले, तसेच हिरवी पाने अन् मोगर्‍याच्‍या फुलांची विशेष सजावट करण्‍यात आली आहे.

Glorification of Tipu Sultan, Tense In Goa : मांगोर हिल, संभाजीनगर (वास्को) येथे टिपू सुलतानचा फलक लावून त्याचे उदात्तीकरण केल्याने तणाव !

यातून क्रूर टिपू सुलतानचे वंशज गोव्यातही कार्यरत आहेत, हे दिसून येते ! त्यांच्या कृत्यांना वेळीच प्रतिबंध करणार्‍या संभाजीनगर येथील युवकांचे अभिनंदन !

पैठणी साडी, घोंगडी आदींना पारंपरिक वस्त्रोद्योग म्हणून मान्यता, सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता मिळणार !

पैठणी साडी, घोंगडी, हिमरू, करवत काठी आणि खण फॅब्रिक या  पारंपरिक वस्त्रोद्योगांना पारंपरिक वस्त्रोद्योग म्हणून राज्यशासनाने मान्यता दिली आहे.

राज्यातील विविध तलावांच्या संवर्धनासाठी राज्यशासनाकडून भरीव निधी !

राज्यशासनाच्या सरोवर संवर्धन योजनेच्या अंतर्गत राज्यातील विविध तलावांच्या संवर्धनसाठी राज्यशासनाकडून भरीव निधी संमत करण्यात आला आहे.

Portuguese Looted Goa : पोर्तुगिजांनी गोव्याला लुटले, तर कदंबची राजवट हा सुवर्णकाळ होता ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पोर्तुगीज राजवटीच्या पलीकडेही प्राचीन गोमंतकाला इतिहास आहे. आपण तो पहाणे आणि पुढच्या पिढीला शिकवणे आवश्यक आहे. पोर्तुगिजांनी गोव्यावर आक्रमण करून सत्ता उपभोगली; मात्र ही सत्ता केवळ गोमंतकियांना लुटण्यासाठीच होती.

विधानभवनाच्या पायर्‍यांवरील आमरण उपोषणामुळेच योजना संमत ! – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालू आहे. ही योजना संमत होण्यासाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आमरण उपोषण करणारा मी पहिला आमदार आहे, हे सार्‍या जनतेला ठाऊक आहे.

पंडित धीरेंद्र शास्त्री महाराजांनी ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि भद्रा मारुति यांचे दर्शन घेतले !

तालुक्यातील वेरूळसह खुलताबाद येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी १२ वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि भद्रा मारुति यांचे दर्शन घेत मंत्रोच्चारात अभिषेक केला.

प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध असणे, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा हिंदु धर्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध होते आणि त्यामुळे आवश्यक ती साधना होणार्‍यांचे प्रमाण अन्य धर्मियांपेक्षा अधिक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रदूषण नियंत्रण; पण सोयीनुसार !

सण-उत्‍सव कोणत्‍याही धर्माचा असो, त्‍यातून प्रदूषण होत असेल, तर ते रोखण्‍यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्‍याचा शुद्ध हेतू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार यांनी बाळगायला हवा. केवळ हिंदु सणांच्‍या वेळी आवई उठवायची आणि वर्षभर होणार्‍या प्रदूषणाकडे डोळेझाक करायची ? अशाने प्रदूषण थांबणार नाही.