Glorification of Tipu Sultan, Tense In Goa : मांगोर हिल, संभाजीनगर (वास्को) येथे टिपू सुलतानचा फलक लावून त्याचे उदात्तीकरण केल्याने तणाव !

 स्थानिक संतप्त युवकांनी चित्र जाळले !

वास्को, ११ नोव्हेंबर (वार्ता.) : मांगोर हिल, संभाजीनगर (वास्को) येथे रस्त्याच्या बाजूला एका वास्तूला नुकतेच टिपू सुलतानचा मोठा फलक लावून त्याला हार घालण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक युवकांनी फलकाला आग लावली. या वेळी येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वास्को पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

संपादकीय भूमिका

यातून क्रूर टिपू सुलतानचे वंशज गोव्यातही कार्यरत आहेत, हे दिसून येते ! त्यांच्या कृत्यांना वेळीच प्रतिबंध करणार्‍या संभाजीनगर येथील युवकांचे अभिनंदन !