मुंबई – राज्यशासनाच्या सरोवर संवर्धन योजनेच्या अंतर्गत राज्यातील विविध तलावांच्या संवर्धनसाठी राज्यशासनाकडून भरीव निधी संमत करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी शहरातील दैवज्ञ भवन तलावाच्या संवर्धनासाठी ३७ लाख ८७ सहस्र ३७६ रुपये, तेलीआळी येथील तलावासाठी १८ लाख ९० सहस्र ६०० रुपये, नाचणे येथील तलावासाठी १ कोटी ५० लाख रुपये, मालगुंड येथील शुभ्रकमळ तलावासाठी १ कोटी ५० लाख रुपये, फणसोप येथील तलावासाठी ५० लाख रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील कातळाचा कोंड तलावासाठी ३ कोटी ७० लाख ५४ सहस्र १७१ रुपये, तसेच नाशिक येथील वेहेळगाव तलावासाठी १ कोटी ९९ लाख ९६ सहस्र १९० रुपये आणि महादेव मंदिर साठवण तलावासाठी १ कोटी ९९ लाख ९८ सहस्र ९७९ रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. यासह माणगाव (रायगड) मधील चांदोरे येथील शिवमंदिर तलावासाठी ३ कोटी १९ लाख ६५ सहस्र १८९ रुपये संमत करण्यात आले आहेत.