कोलकात्यात ३१ डिसेंबरपासून अंडरवॉटर मेट्रोचा होणार प्रारंभ

हुगळी नदीतळापासून १३ मीटर खाली बोगदा

कोलकाता (बंगाल) – देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी कोलकातामध्ये धावणार आहे. भूमीपासून ३३ मीटर खाली आणि हुगळी नदीतळाच्या १३ मीटर खाली ५२० मीटर लांबीच्या बोगद्यात रुळ टाकण्यात आले आहेत. हावडा स्थानक ते महाकरण स्थानकापर्यंत मेट्रोचे अंतर ५२० मीटर लांब प्रवास बोगद्यातून पूर्ण होणार आहे. ही गाडी ताशी ८० कि.मी. वेगाने केवळ ४५ सेकंदात बोगदा पार करेल. या बोगद्याद्वारे हावडा थेट कोलकात्याशी जोडले जाईल. यामुळे प्रतिदिन ७ ते १० लाख लोकांचा लाभ होणार आहे. वर्ष १९८४ मध्ये कोलकात्यामध्येच देशातील पहिली मेट्रो ट्रेन चालू झाली होती.