नाशिक – मुंबई येथील साकीनाका पोलिसांनी अमली पदार्थ बनवणार्या नाशिक येथील कारखान्यावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांचे एम्.डी. (मॅफेड्रॉन) जप्त केले आहे.
श्री गणेशाय इंडस्ट्रीज् या आस्थापनात अमली पदार्थ बनवले जात असल्याचे उघड झाले. मुंबई पोलिसांनी आस्थापनाच्या मालकाला कह्यात घेतले आहे.
नाशिकमधील कारखान्यावर मुंबई पोलिसांची धाड, 300 कोटींचे अमली पदार्थ जप्त, 12 जण अटकेत #MumbaiPolice #Drugs #Nashik https://t.co/Ys2wvgs5tE
— ABP माझा (@abpmajhatv) October 6, 2023
काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईविषयी नाशिक पोलिसांना कल्पना नव्हती.