सातारा – सातारा जिल्हा अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे पिंपरी-चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून स्थानांतर झाले आहे. सातारा पोलीस दलामध्ये यापूर्वी विभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या आँचल दलाल-डुडी यांची अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे एक वर्षापूर्वी सातारा येथून सांगली येथे स्थानांतर झाले होते. सातारा येथे असतांना निर्भया पथकांची स्थापना, ए.टी.एम्.मधून चोरी करणार्या टोळ्यांचा बंदोबस्त करणे यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते.