बोरीवली (मुंबई) येथील कथ्‍थक नृत्‍यांगना सौ. मनीषा पात्रीकर यांच्‍या कथ्‍थक नृत्‍याच्‍या संशोधनात्‍मक प्रयोगाच्‍या वेळी साधकांना आलेल्‍या अनुभूती

१८ ते २२.४.२०२२ या कालावधीमध्‍ये महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्रामध्‍ये बोरीवली (मुंबई) येथील कथ्‍थक नृत्‍यांगना सौ. मनीषा पात्रीकर यांचे कथ्‍थक नृत्‍यातील विविध प्रकारांचे प्रयोग घेण्‍यात आले.

नौपाडा (ठाणे) येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर यांच्‍या  आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर त्‍यांच्‍या यजमानांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती !

७.१०.२०२३ या दिवशी (कै.) सौ. नम्रता ठाकूर यांचा निधनानंतरचा ११ वा दिवस आहे. त्‍या निमित्त त्‍यांचे पती श्री. नंदकिशोर ठाकूर यांना त्‍यांच्‍या शेवटच्‍या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती…

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली देवद (पनवेल) येथील कु. गिरीजा संतोष खटावकर (वय ७ वर्षे)  !

आज भाद्रपद कृष्‍ण अष्‍टमी (७.१०.२०२३) या दिवशी देवद (पनवेल) येथील कु. गिरीजा संतोष खटावकर हिचा ७ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिच्‍या आईला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

‘गुरुतत्त्व एकच असते’, याची आलेली अनुभूती आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सुचवलेली प्रार्थनारूपी कविता

करता येऊ दे कृती, भावाला जोडून ।
कर्तेपणा जाईल तेव्‍हा अहंकाराला सोडून ॥

छत्रपती संभाजीनगर येथे निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याविषयी १० कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !

भारत निवडणूक आयोगाच्या कामात हलगर्जीपणा करणे, वारंवार संपर्क करूनही शासकिय कर्मचारी कामावर उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या आदेशाने…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या जनजागृतीसाठी २६२ उच्चशिक्षण संस्थांमधील ७२१ विद्यार्थ्यांची निवड !

निवडलेल्या विद्यार्थी स्वयंसेवकांची सूची विद्यापीठ अनुदान आयोगाने घोषित केली आहे.

अधिवक्त्याला विनाकारण डांबून ठेवणार्‍या साहाय्यक पोलीस निरीक्षकासह ६ जणांवर ७ वर्षांनी गुन्हा नोंद !

७ वर्षांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात गेलेल्या एका अधिवक्त्याला विनाकारण डांबून ठेवण्यात आले होते. याविषयी संबंधित अधिवक्त्याने येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात संबंधित साहाय्यक पोलीस निरीक्षकासह त्यांच्या….

देशात नथुराम गोडसे यांचे नाव घेतलं तरी जगभरात गांधीजींचेच नाव आहे ! – बाबा आढाव

येथील ‘भटक्या विमुक्त प्रतिष्ठा’न संघाच्या कार्यक्रमांमध्ये बोलतांना बाबा आढाव यांनी देशात नथुराम गोडसे यांचे नाव घेतले, तरी जगभरात गांधीजींचेच नाव आहे, त्याचे काय कराल ? असा प्रश्न सत्ताधारी नेत्यांना विचारला.

नवी देहली येथील केंद्रीय गृहमंत्रालयाच्‍या बैठकीत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्‍वाही !

महाराष्‍ट्रातील नक्षलग्रस्‍त भागात मागील वर्षभरापासून विविध विकास योजना परिणामकारकपणे राबवल्‍या जात आहेत. त्‍यामुळे गडचिरोलीसारख्‍या भागातील  नक्षलवाद पूर्णपणे संपवण्‍यात आम्‍ही लवकरच यशस्‍वी होऊ,…

छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीला कुलूप; ठेवीदार हवालदिल !

क्रेडिट सोसायटीत शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे. सिडको एन्-२ येथील सोसायटीला कुलूप लावून संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी पसार झाले आहेत.