आज सांगली येथे ‘सकल हिंदु समाज’ सांगली जिल्‍ह्याच्‍या वतीने धरणे आंदोलन !

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने शनिवार, ७ ऑक्‍टोबरला सकाळी ११ वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे धरणे आंदोलन करण्‍यात येणार आहे. या प्रसंगी पुसेसावळी येथील दंगलीस कारणीभूत समाजकंटकांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करावा, यांसह अन्‍य मागण्‍या करण्‍यात येणार आहेत.

गोरेगाव (मुंबई) येथे इमारतीच्‍या वाहनतळाला आग लागून ८ जणांचा मृत्‍यू, तर ५८ जण घायाळ !

गोरेगाव येथील उन्‍नतनगरमध्‍ये ‘जय भवानी’ इमारतीच्‍या वाहनतळामध्‍ये भीषण आग लागून ८ जणांचा होरपळून मृत्‍यू झाला, तर ५८ जण घायाळ झाले आहेत. ५ ऑक्‍टोबरच्‍या मध्‍यरात्री ३ वाजता ही आग लागली. घायाळ झालेल्‍या व्‍यक्‍तींमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

वसईतील ‘प्रखर राष्‍ट्रचेतना सभे’ची जय्‍यत सिद्धता !

‘सनातन धर्म सभे’च्‍या वतीने आयोजित या सभेची सिद्धता पूर्ण झाली असून ८ ऑक्‍टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता साध्‍वी प्रज्ञा सिंह या पत्रकारांशी ‘हॉटेल शेल्‍टर’ येथे संवाद साधतील.

सनातन धर्माला अपकीर्त करणार्‍यांचे कटकारस्‍थान हाणून पाडा ! – महंत राजनाथ योगी महाराज

आज देशात काही लोक आणि काही राजकीय पक्ष हिंदु सनातन धर्माला अपकीर्त करत आहेत. हिंदुविरोधी कटकारस्‍थान रचले जात असून ते हाणून पाडायला हवे. अशा लोकांना वेळीच त्‍यांची जागा दाखवा, असे आवाहन महंत राजनाथ योगी महाराज यांनी केले.

कोल्‍हापूरचा ‘शाही दसरा’ राज्‍यशासनाकडून ‘राज्‍य महोत्‍सव’ म्‍हणून घोषित !

कोल्‍हापूरचा शाही दसरा हा राज्‍यशासनाने ‘राज्‍य महोत्‍सव’ म्‍हणून घोषित केला आहे. यानिमित्ताने जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने १५ ते २४ ऑक्‍टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

नवरात्रोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्‍या स्‍वच्‍छतेस प्रारंभ !

कोल्‍हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दर्शनासाठी भाविक केवळ महाराष्‍ट्रच नव्‍हे, तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तसेच अन्‍य राज्‍यांतूनही मोठ्या प्रमाणात येतात. आता सर्वसाधारणपणे प्रतिदिन ५ सहस्र भाविक दर्शन घेत आहेत. नवरात्रात हा आकडा लाखात जातो. त्‍यामुळे यंदा भाविकांची विक्रमी गर्दी होण्‍याचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

रुग्‍णालयातील मृत्‍यूंच्‍या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी व्‍हावी ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्‍यमंत्री

राज्‍यातील रुग्‍णालयांमध्‍ये सर्वसामान्‍यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्‍यात आले आहे ? आरोग्‍ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्‍येच आहेत.

सातारा जिल्‍ह्यात डेंग्‍यू आणि चिकनगुनियाचे ३१२ रुग्‍ण !

सातारा जिल्‍ह्यात पावसामुळे डासांच्‍या उत्‍पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्‍ह्यात डेंग्‍यू आणि चिकनगुनियाचे रुग्‍ण आढळून येत आहेत. वर्ष २०२३ मध्‍ये आतापर्यंत डेंग्‍यू आणि चिकनगुनियाचे ३१२ रुग्‍ण आढळून आले आहेत.

पुणे येथील वारजे पुलाखाली नदीपात्रात महापालिकेचा शेकडो ट्रक माती आणि राडारोडा !

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते असे म्हणून विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौद’ बांधणार्‍या पुणे महापालिकेचा हिंदुद्वेष्टेपणा ! भाविकांनीच याचा जाब पालिकेला विचारायला हवा आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा !

सर्वत्रच्‍या अशा पोलिसांवर कारवाई व्‍हावी !

पोलीस ठाण्‍यातील कोठडीत एका व्‍यक्‍तीला विनाकारण ३० मिनिटे डांबणार्‍या देहलीतील २ पोलीस उपनिरीक्षकांना देहली उच्‍च न्‍यायालयाने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. त्‍यांच्‍या वेतनातून हे पैसे वसूल करण्‍यात येणार आहेत.