सनातन संस्थेची हेतूतः अपकीर्ती करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार! – सनातन संस्था

नुकताच नालासोपारा प्रकरणामध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे श्री. वैभव राऊत यांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणी श्री. वैभव राऊत यांच्यावर त्यांच्याकडे बॉम्ब सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ऑक्टोबरच्या शेवटी गगनयान मोहिमेची चाचणी

या चाचणीविषयी इस्रोचे शास्त्रज्ञ आणि ‘इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिट’चे संचालक पद्मा कुमार म्हणाले की, क्रू एस्केप सिस्टम अंतराळवीरांना रॉकेटपासून दूर नेईल. या प्रणालीच्या चाचणीसाठी चाचणी वाहन सिद्ध करण्यात आले आहे.

इस्रायलच्या ७ शहरांवर ‘हमास’ने डागले ५ सहस्र रॉकेट !

प्रत्युरादाखल इस्रायलच्या वायूदलाकडूनही पॅलेस्टाईनवर आक्रमण

सनातन धर्माला डिवचले, तर राज्यात मणीपूरसारखी अवस्था होईल ! – पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी

शिवमोग्गातील रागिगुड्ड येथे झालेल्या दंगलीच्या संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.

गोव्यात ९ मासांत झालेल्या २ सहस्र ९० अपघातांत २१० जणांनी गमावले प्राण

आकडेवारीनुसार राज्यात दिवसाला सरासरी ८ अपघात होतात, तर प्रत्येक ३१ घंट्यांत एकाचा अपघातामुळे मृत्यू होत असतो.

कर्नाटकने धरणासाठी काढलेली निविदा अर्थहीन ! – महाधिवक्ता पांगम

हे प्रकरण सध्या सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट झालेले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला अनुज्ञप्ती न घेता कळसा-भंडुरा धरण प्रकल्प उभारता येणार नसल्याची चेतावणी दिली आहे.

सात्त्विक व्यक्तींच्या जीवनाचे अंतिम ध्येय !

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्‍यवस्‍था रहित करा ! – इचलकरंजी येथे निवेदन

‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे उदयनिधी स्‍टॅलिन, ए. राजा अन् त्‍याचे समर्थन करणारे प्रियांक खर्गे यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, या मागण्‍यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देण्‍यात आले.

प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्‍थळांविषयी बोलणे चुकीचे ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

धार्मिक स्‍थळे मंदिरे, मशीद किंवा बौद्ध विहार यांना लष्‍कराच्‍या कह्यात देणे चुकीचे आहे. सर्वांच्‍या धार्मिक भावना वेगळ्‍या असून अधिष्‍ठानही वेगळे आहे. त्‍याविषयी वंचित बहुजन आघाडीचे अध्‍यक्ष प्रकाश आंबेडकरांनी बोलणे योग्‍य नाही….

समृद्धी महामार्ग ५ दिवसांसाठी बंद रहाणार !

जालना ते छत्रपती संभाजीनगर दोन्‍ही बाजूंची वाहतूक १० ते १२ ऑक्‍टोबर या कालावधीत दुपारी १२ ते ३.३० वाजेपर्यंत बंद रहाणार आहे. समवेतच दुसर्‍या टप्‍प्‍यात २५ ते २६ ऑक्‍टोबर या कालावधीत दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद रहाणार आहे