पुसेसावळी दंगलीचे प्रकरण !
सांगली – सांगलीत नुकतेच मुसलमान समाजाने आंदोलन करून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील दंगलीचे खापर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला. या मागणीला सकल हिंदु समाजाचा विरोध असून त्यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने शनिवार, ७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकल हिंदु समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
या प्रसंगी पुसेसावळी येथील दंगलीस कारणीभूत असलेल्या समाजकंटकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, यांसह अन्य मागण्या करण्यात येणार आहेत. या बैठकीला हिंदु एकता आंदोलनचे जिल्हाप्रमुख विष्णुपंत पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, सांगली शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हणमंत पवार, विनायक माईणकर, अधिवक्ता बाळासाहेब देशपांडे यांसह अन्य उपस्थित होते.