रुग्‍णालयातील मृत्‍यूंच्‍या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी व्‍हावी ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्‍यमंत्री

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्‍यातील रुग्‍णालयांमध्‍ये सर्वसामान्‍यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्‍यात आले आहे ? आरोग्‍ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्‍येच आहेत. नांदेडच्‍या रुग्‍णालयातील ‘डीन’वर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद होतो, तर अन्‍य रुग्‍णालयांच्‍या संदर्भात तसे का होत नाही ? रुग्‍णालयात होणार्‍या मृत्‍यूचे कारण सरकारमधील भ्रष्‍टाचार आहे. त्‍यामुळे रुग्‍णालयातील मृत्‍यूंची ‘सीबीआय चौकशी व्‍हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ ऑक्‍टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली. जिल्‍ह्यांमध्‍ये रुग्‍णालयांत उपचार घेणार्‍या नागरिकांच्‍या मृत्‍यूंची वाढती संख्‍या याविषयी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदत आयोजित केली होती.