
वसई – ८ ऑक्टोबर या दिवशी साईनगर मैदान, वसई (प.) येथे खासदार तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रज्ञा सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘प्रखर राष्ट्रचेतना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सनातन धर्म सभे’च्या वतीने आयोजित या सभेची सिद्धता पूर्ण झाली असून ८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता साध्वी प्रज्ञा सिंह या पत्रकारांशी ‘हॉटेल शेल्टर’ येथे संवाद साधतील.
दुपारी ३ वाजता वसईतील प्रतिष्ठित व्यक्तींसमवेत बैठक होईल. सायंकाळी ५ वाजता भव्य स्वागत यात्रेसह त्यांचे सभेच्या ठिकाणी त्यांचे प्रस्थान होईल आणि पुढे त्या सभेला संबोधित करतील.
वसई पूर्व येथील हॉटेल रेजन्सी येथे शुक्रवार ६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. महामंडलेश्वर संत सदानंद बन महाराज यांच्या अध्यक्षतेखालील १०१ जणांची समिती सभेच्या सिद्धतेसाठी कार्यरत आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा