कोल्हापूर – कोल्हापूरचा शाही दसरा हा राज्यशासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात १५ ऑक्टोबरला महोत्सवाचे उद़्घाटन, १६ ऑक्टोबरला सर्व शाळा, महाविद्यालये येथे पारंपरिक वेशभूषा दिवस; १९ ऑक्टोबरला सकाळी ८ ते १० महिलांची शोभायात्रा आणि सायंकाळी ५ वाजता भारतीय युद्धकला स्पर्धा, तर २४ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता जुना राजवाडा ते दसरा चौक मार्गावर भव्य शोभायात्रा होईल. यात ढोल-ताशा पथक, लेझिम पथक, मावळा पथक, यांसह मर्दानी खेळ आणि अन्य प्रदर्शनीय खेळ यांचा समावेश असेल.