पुणे महापालिकेच्या अधिकार्यांचा मनमानी कारभार उघड !
पुणे – वारजे येथील मुठा नदीवरील पुलाखाली नदीपात्रात महापालिकेच्या सांडपाणी विभागाचे खोदाई काम चालू असून त्यातील शेकडो ट्रक माती, राडारोडा नदीपात्रात आणून टाकला जात आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यास या राडारोड्यामुळे पुराचा धोका निर्माण होतो. या विषयी वारजे क्षेत्रीय अधिकारी, सांडपाणी विभाग अधिकारी, तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना संपर्क केला असता याविषयी माहितीच नाही, असे सांगून त्यांनी ‘हात वर’ केले. शेवटी एका अधिकार्याने हा राडारोडा महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाचा असल्याचे खासगीत मान्य केले. नदीपात्रात राडारोडा टाकणे हा गुन्हा असून खासगी व्यक्ती आणि आस्थपन यांवर महापालिका कारवाई करते; मात्र स्वतः महापालिकेच्या सांडपाणी विभागाने शेकडो ट्रक माती आणि राडारोडा वारजे पुलाखाली नदीपात्रात टाकून दिला आहे.
संपादकीय भूमिकाश्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते असे म्हणून विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौद’ बांधणार्या पुणे महापालिकेचा हिंदुद्वेष्टेपणा ! भाविकांनीच याचा जाब पालिकेला विचारायला हवा आणि दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा ! |