खरे सुख !

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘जी-२०’ परिषदेविषयी चीनकडून भारताची स्तुती : अमेरिकेवर टीका !

भारत आर्थिक सुधारणा आणि बहुपक्षीय मुत्सद्देगिरी यांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो; परंतु अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांना हे नको आहे. हे देश रशिया-युक्रेन युद्धाला अधिक महत्त्व देत आहेत. पाश्चात्त्य देशांनी सतत भारत-चीन संघर्षाला खतपाणी घातले आहे.

नाग नदीच्या संवर्धनाच्या अध्यादेशात ‘नाग नदी प्रदूषण संवर्धन प्रकल्प’ असा अयोग्य उल्लेख !

शब्दांच्या अनेक चुका असलेले शासन आदेश ! शासन आदेशांमध्ये शब्दांच्या, व्याकरणाच्या अनेक चुका दिसून येतात, त्यामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ पालटतो, ते सुधारण्यासाठी सरकारने आधी प्रयत्न करावेत.

हिंदू मातंग समाजाचे मिशनर्‍यांकडून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी सांगलीत मोर्च्याचे आयोजन !

हिंदू मातंग समाजाचे मिशनर्‍यांकडून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी समाजाच्या वतीने ११ सप्टेंबर या दिवशी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. विलिंग्डन कॉलेजपासून मोर्च्यास प्रारंभ होणार असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

एस्.टी.चा विकास रोखणारे ‘गतीरोधक’ !

एस्.टी.च्या अमृत महोत्सवी वर्षात बसस्थानकांवर प्राथमिक सुविधाही नसणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना लज्जास्पद !

सरसकट कुणबी समाजाला प्रमाणपत्र द्यावे ! – उपोषणावर मनोज जरांगे-पाटील ठाम 

राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात ९ सप्टेंबर या दिवशी झालेली चर्चेची तिसरी फेरी निष्फळ ठरली. यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण अव्याहत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

पिंपरी (पुणे) नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी, पवना धरणातून ५ सहस्र ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग 

मावळासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. ७ सप्टेंबरच्या रात्रीपासून मावळसह धरण परिसरात जोरदार पाऊस चालू आहे.

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

१९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्री गणेशचतुर्थी योग्यच आहे.

उलट-सुलट कसेही वाचले, तरी सारखाच अर्थ रहाणारा शब्द किंवा वाक्य म्हणजे ‘विलोमपद’ (पॅलिंड्रोम) !

‘पॅलिंड्रोम’ (Palindrome) म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार, वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी उलट-सुलट कशीही वाचली, तरी सारखीच रहाते (शेवटाकडून आरंभाकडे वाचत गेेले, तरी पालटत नाही) मराठीत त्याला ‘विलोमपद’ म्हणतात.