भाविकांच्‍या सुविधेसाठी शेतकरी संघाच्‍या इमारतीचे तात्‍पुरते अधिग्रहण !- राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर, कोल्हापूर

कोल्‍हापूर – श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सुविधा देण्‍यासाठी शेतकरी संघाच्‍या इमारतीचे तात्‍पुरते अधिग्रहण करण्‍यात आले आहे. नियमानुसार या काळातील रितसर भाडे दिले जाईल. स्‍थानिक आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांच्‍याशी चर्चा केल्‍यानंतरच अधिग्रहणाचा निर्णय आहे, अशी माहिती जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकारांना दिली.

जिल्‍हाधिकारी पुढे म्‍हणाले, ‘‘श्री महालक्ष्मीदेवीच्‍या भाविकांसाठी ज्‍या ज्‍या वेळी सुविधा देण्‍याचा विषय आला त्‍या त्‍या वेळी नेहमीच शेतकरी संघाच्‍या इमारतीचा पर्याय समोर आला. शेतकरी संघ आणि ‘मॅग्‍नेट’ संस्‍था यांच्‍यातील वादामुळे ही इमारती गेली कित्‍येक वर्षे विनावापर पडून आहे. उत्‍पन्‍न मिळत नाही, ही वस्‍तूस्‍थिती आहे. उलट ही वास्‍तू आता भाविकांच्‍या सेवेसाठी वापरली जाणार आहे.’’