मिरज येथे काही गणेशोत्‍सव मंडळांकडून पौराणिक देखाव्‍यांचे सादरीकरण !

विश्वचौक गणेशोत्सव मंडळातील श्री दत्त जन्म कथेचा केलेला दिखावा

मिरज – अवाढव्‍य आणि चित्रविचित्र मूर्ती, विद्युत् रोषणाईचा झगमगाट, तसेच ध्‍वनीप्रदूषणाला बगल देत काही गणेशोत्‍सव मंडळांनी पौराणिक देखाव्‍यांचे सादरीकरण करून नागरिकांची मने जिंकली आहेत. यात विशेष करून विश्‍वचौक गणेशोत्‍सव मंडळाचा श्री दत्त जन्‍म कथा, श्री दिंडीवेस गणेशोत्‍सव मंडळाचा श्री हनुमंताची श्रीरामभक्‍ती रणझुंझार मंडळाचा श्री नृसिंह अवतार आणि भक्‍त प्रल्‍हाद हे हलते देखावे पहाण्‍यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे. देखाव्‍यांसमवेत भजन, कीर्तन आणि पौराणिक कथांच्‍या ध्‍वनीफिती या हलत्‍या देखाव्‍यांच्‍या ठिकाणी लावून पावित्र्य जपण्‍यासाठी केलेले या निवडक मंडळांचे प्रयत्न स्‍तुत्‍यच आहेत.

श्री दिंडीवेस येथील गणेशोत्‍सव मंडळाचा हनुमंताची श्रीरामभक्‍ती हा देखावा
रणझुंझार गणेशोत्‍सव मंडळाचा श्री नृसिंह अवतार आणि भक्‍त प्रल्‍हाद यांचा देखावा