मणीपूरमध्ये सुटीवर असलेल्या सैनिकाची डोक्यात गोळी घालून हत्या !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी सेर्टो थांगथांग कोम यांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.

आपला व्यवसाय भरभराटीस येईल किंवा नष्ट होईल, हे आपण आपली सचोटी कशी राखतो ?, यावर अवलंबून ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

आपण सर्वांना मूर्ख बनवू शकतो; पण स्वतःला नाही. आपला व्यवसाय भरभराटीस येईल किंवा नष्ट होईल, हे आपण आपली सचोटी कशी राखतो ?, यावर अवलंबून असते, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.  

आजपासून संसदेच्या नवीन इमारतीत कामकाजाला होणार प्रारंभ !

लोकशाहीच्या संसदेवर आतंकवादी आक्रमण झाले. हे आक्रमण आपल्या आत्म्यावर होते. ज्या सैनिकांनी आतंकवाद्यांशी लढतांना आपले रक्षण केले, त्यांनाही कधीच विसरता येणार नाही.

वर्ष २०३० पर्यंत आर्क्टिक महासागरातील हिमनद्या नष्ट होण्याची शक्यता !

भारतात वादळी पाऊस आणि पूर यांची शक्यता वाढली आहे. जंगलांचा र्‍हास होत आहे. पावसामुळे भूमी वाहून जात असून नद्या तुडुंब भरत आहेत.

मुसलमानाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीशी लग्न केल्यावर सासरी तिची छळवणूक !

सासरची मंडळी मुसलमान आहेत. मी हिंदु असल्याने मला हिंदु रितीरिवाजानुसार पूजा-अर्चा करायची आहे; परंतु  सासरचे लोक मला तसे करू देत नाहीत.’

‘टोईंग’ केलेली वाहने सोडवतांना दंडाची भीती दाखवून पोलीस पैसे उकळतात !

मुंबईत नियमित सहस्रावधी वाहने ‘टोईंग’ केली जातात. त्‍यामुळे यामध्‍ये मुंबईत अशा प्रकारे कुठे कुठे दंडाची भिती दाखवून वाहतूक पोलीस नागरिकांची लुटमार करत आहेत ? याचा शोध वाहतूक विभागाने घेऊन अशा भ्रष्ट पोलिसांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.

रझाकारांना धडा शिकवणार्‍यांनो आता ‘सजाकारांना’ शिक्षा द्या ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष, मनसे

तुम्‍ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्‍यावर ही वेळ आणणार्‍या  ‘सजाकारांना’ शिक्षा द्या, असे ट्‍वीट राज ठाकरे यांनी मराठावाडा मुक्‍तीसंग्रामदिनाच्‍या निमित्ताने केले.

मराठवाड्याला ‘मागास’ शब्‍दापासून मुक्‍ती मिळाली पाहिजे ! – मुख्‍यमंत्री

मुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले की, मराठवाडा मुक्‍तिसंग्राम दिनाचा आपण सार्थ अभिमान बाळगायला हवा. अनेक ध्‍येयवादी स्‍वातंत्र्यसैनिकांच्‍या अमूल्‍य बलीदानातून आणि जनतेच्‍या सक्रीय पाठिंब्‍यातून मराठवाडा निजामाच्‍या जुलमी राजवटीतून मुक्‍त झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने राज्‍यात ११ कलमी कार्यक्रम राबवणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

नमो तीर्थस्‍थळ आणि गडदुर्ग संरक्षण अभियानातून ७३ पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्‍थळांची सुधारणा आदी कार्यक्रम या अभियानातून राज्‍यात राबवण्‍यात येणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

व्‍हिसा संपूनही पुणे येथे अवैधपणे रहाणार्‍या परदेशी नागरिकांची विशेष शाखेकडून शोधमोहीम चालू !

पुणे – शहरात परदेशी नागरिक शिक्षण आणि व्‍यवसाय यानिमित्त वास्‍तव्‍य करतात. यासाठी ‘स्‍टुडंट व्‍हिसा’ किंवा ‘बिझनेस व्‍हिसा’ घ्‍यावा लागतो. या ‘व्‍हिसा’ची मुदत संपल्‍यावर काही जण मुदत वाढवून काही दिवस वास्‍तव्‍य करतात. अशा नागरिकांवर न्‍यायालयीन कारवाई करून त्‍यांना पुन्‍हा मायदेशी पाठवण्‍यासाठी पुणे शहरात पोलिसांनी अशा नागरिकांची सूची सिद्ध केली आहे. त्‍यानुसार अनुमाने ३२५ नागरिक पुणे शहरात … Read more