मणीपूरमध्ये सुटीवर असलेल्या सैनिकाची डोक्यात गोळी घालून हत्या !

३ सशस्त्र आक्रमणकार्‍यांनी अपहरण करून नंंतर केली हत्या !

इंफाळ (मणीपूर) – येथील इंफाळ पश्‍चिम जिल्ह्यातील खुनिंगथेक गावात सुटीवर असलेल्या एका सैनिकाची हत्या करण्यात आली.  सेर्टो थांगथांग कोम असे या सैनिकाचे नाव असून ते कांगपोकपी जिल्ह्यातील लिमाखोंग येथे सैन्याच्या ‘संरक्षण सुरक्षा कॉर्प्स’मध्ये कार्यरत होते. १७ सप्टेंबर या दिवशी पोलिसांना येथे त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी सेर्टो थांगथांग कोम यांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.

मणिपूरमध्ये ३ मेपासून हिंदु मैतेई आणि ख्रिस्ती कुकी आतंकवादी यांच्यामध्ये हिंसाचार चालू असून यामध्ये आतापर्यंत १७५ लोकांचा मृत्यू झाला आहे.