मुसलमानाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीशी लग्न केल्यावर सासरी तिची छळवणूक !

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील एका मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर पीडित मुलीच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ चालू केला. नमाजपठणासाठी तिच्यावर दबाव टाकला. नमाजपठण न केल्यास घटस्फोटाची देण्याची धमकी देण्यात आली आहे. याविषयी पडित हिंदु तरुणीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे, ‘६ मासांपूर्वी माझे लग्न झाले होते. यापूर्वीही सासरच्या लोकांकडून होण्यार्‍या छळाविषयी पोलिसांत तक्रार केली होती; पण त्यावेळी तडजोड झाली होती. नवरा घटस्फोट देण्याची धमकी देत आहे.सासरची मंडळी मुसलमान आहेत. मी हिंदु असल्याने मला हिंदु रितीरिवाजानुसार पूजा-अर्चा करायची आहे; परंतु  सासरचे लोक मला तसे करू देत नाहीत.’